नेवासा तालुक्यातील विविध पक्ष आणि संघटनेच्या पदाधिकारी यांची भेट घेताना धर्मरक्षक गणेश चौगुले सर




अफसर शेख अहमदनगर



नेवासा तालुका प्रतिनिधी:- नेवासा तालुक्यातील क्रांतीचे गाव म्हणून बेलपिंपळगावची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे. 1912 मध्ये सहकार उभे करणारे चौगुले परिवार आहे.

    योगा दिनाच्या निमित्ताने तालुक्याच्या दौऱ्यावर असताना नेवासा फाटा राजमुद्रा चौक येथे मुळा कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर वडापाव सेंटर येथे भेट दिली. त्या प्रसंगी सोपानराव पंडित यांच्या सह विविध सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या पद अधिकारी यांची चौगुले यांनी भेट घेऊन राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, , सांस्कृतिक विविध विषयांवर सकोल चर्चा केली. त्या प्रसंगी नामदार शंकरराव मित्रमंडळ ला भेट दिली.ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख साहेब यांचे स्वीय सहायक पी. आर.जाधव साहेब,युवा नेते माऊली भाऊ देवकाते, भाऊसाहेब पाटील निपुंगे, दिगंबर पाटील नीपंगे, ज्ञानेश्वर कराडे,लक्ष्मणराव कराडे, शिवाजीराव निपुंगे पाटील आदी या वेळी उपस्थित होते . चाय, भाजिया, कॉफी पे चर्चा सत्र जणू काही आयोजन झाले होते. नामदार शंकरराव गडाख साहेब यांच्याशी निष्ठावान कार्यकर्ते यांना भेटून आनंद झाल्याचे धर्मरक्षक गणेश चौगुले म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post