पावसाळ्यात स्लॅब लीकिज होतात भिंतीवर बुरशी येते याबाबत पेंटर ची कार्यशाळा मालेगाव येथे संपन्न




मालेगाव / सुरज अवचार :-

    मालेगाव येथील आदिशक्ती हार्डवेअर आणि पेंट्स येथे बुधवार २१ जून रोजी ग्रामीण भागातील पेंटर ची कार्यशाळा संपन्न झाली.

   पावसाळ्यामध्ये बऱ्याच घराच्या छताचा लिकिज, भिंतीवर बुरशी येणे आदी समस्यां निर्माण होतात महागड्या कलरिंग चा खर्च वाया जातो त्यामुळे या समस्येचे निवारण कशापद्धतीने करावे याबाबत मार्गदर्शन नेरोल्याक चे कंपनी कडून मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे याचा फायदा निश्चितच होण्यासाठी पेंटर प्रशिक्षित असावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आदिशक्ती हार्डवेअर आणि पेंटस चे राहुल गाभने व परिसरातील पेंटर ची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post