प्रतिनिधी रुपेश बाजड
रिसोड:ता 22
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला गेट क्रमांक एक ला कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि गेट क्रमांक दोन ला स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच नाव देण्यासाठी शिवसुर्य प्रतिष्ठान च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती आणि सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शिवसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोपाल पाटील जाधव यांनी लवकरात लवकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला महापुरुषांचे नावे द्यावी या संदर्भात सभापती यांच्यासोबत चर्चा केली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडून या बाबीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले प्रसंगी शिवसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोपाल पाटील जाधव उपाध्यक्ष रुपेश पाटील बाजड सचिव कपिल पाटील कदम कोषाध्यक्ष संदीप पाटील जाधव मंगेश जाधव प्रज्वल नरवाडे हे उपस्थित होते.
