पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात वाडेबोल्हाई येथील शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण...!




तौफिक शेख 

पुणे २२/६/२३: पुण्यातील वाडेबोल्हाई येथील ( ता.हवेली) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शेतकऱ्याला पेशाने वकील असलेल्या वक्तीने जबर मार हान केल्याची घटना पुणे वाडेबोल्हाई येथे घडली पुणे जिल्हाधिकारी  कार्यालयात तुफान हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे दालन असलेल्या पाचव्या मजल्यावर, एका शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. वाडेबोल्हाई येथील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांना ही मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. विरोधी पक्षकाराच्या वकिलाने दमदाटी करून मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. तर स्वसंरक्षणासाठी मारहाण केल्याचा दावा वकिलांनी केला आहे. तर मारहाण करणाऱ्या वकिलाची नाव अद्याप समजू शकले नाही. सरकारी ऑफिसमध्ये असा प्रकार घडणं म्हणजे लाजीरवाणं आहे. तर हा वाद सोडवण्यासाठी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. जमिनीचे कागदपत्राबाबत कामासाठी शेतकरी कार्यालयात आला असताना हा प्रकार घडला आहे. यावरुन आता पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post