या' योजनेद्वारे जिल्ह्यातील ३५४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात एक काेटी वर्ग

*'या' योजनेद्वारे जिल्ह्यातील ३५४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात एक काेटी वर्ग* 

अहमदनगर अफसर शेख

 मागासवर्गीय मुलामुलींना उच्च ‍शिक्षण घणे सुकर व्हावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. २०२० पासून अर्थसहाय्यापासून वंचित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्‍यामध्ये अर्थसहाय्य अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी दिली.
 शासनाकडून नगर जिल्ह्यासाठी १ कोटी ४ लाख १ हजार रूपयांचा निधी १८ मे रोजी समाज कल्याण विभागास प्राप्त झाला होता. या निधीतून २०२०-२१ मधील प्रलंबित एका विद्यार्थ्यांना १८,६५० रूपये, २०२१-२२ मधील दुसऱ्या हप्त्यापासून वंचित ३३ विद्यार्थ्यांना ५ लाख ४५ हजार २१० रूपयांचे अर्थसहाय्य वर्ग करण्यात आले आहे. २०२२-२३ मधील प्रलंबित ३२० विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ९७ लाख ९९ हजार ३०० रूपयांचा अर्थसहाय्य निधी वर्ग करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post