खूशखबर; प्रोत्साहन अनुदानासाठी आणखी दीड हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर




अहमदनगर अफसर शेख

सरकारने महात्मा जाेतिराव फुले शेतकरी कर्जमाफी याेजना जाहीर केली. या याेजनेनुसार नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सहकार विभागाकडून प्रोत्साहन अनुदानाची आणखी दीड हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी त्वरित आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी केले आहे. *५० हजारांपर्यंत अनुदान जाहीर*

महात्मा जाेतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले आहे. याची सहकार विभागाने यादीही जाहीर केली हाेती. मात्र, त्यात आणखी एक हजार ५४२ शेतकऱ्यांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी प्रोत्साहन अनुदानासाठी बँकेत जाऊन खात्री करून घ्यावी. जवळपासच्या सेतू सुविधा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, आधार प्रमाणीकरण केल्यानंतर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post