रिसोड : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे राज्यभरात पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.रिसोड जमात-ए-इस्लामी हिंद शाखेच्यावतीने तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना पावसाळापूर्व साफसफाईचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, 5 जून ते 12 जून या कालावधीत हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून, त्यादरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करणे, शहरातील प्लास्टिक काढून वैज्ञानिक पद्धतीने नष्ट करणे, शहरातील डासांच्या वाढलेल्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, डेंग्यूसारखे आजार टाळण्यासाठी फॉगिंग मशिनद्वारे नियंत्रण आवश्यक झाले आहे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना जमात-ए-इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष शेख रिजवान, शेख वकार, शेख बबलू, तैवाज खान, मो.नदीम, फसीउद्दीन आदी उपस्थित होते.
Tags
शैक्षणिक
