सिंजेन्टा इंडिया आणि कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने मेडशी येथील शेतकरी बांधवांसाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक सादर
मेडशी @ अल्ताफ पठाण
मेडशी : वाशिम जिल्हा हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून परिचित आहे.येथील जास्तीत जास्त शेतकरी वर्ग हा सोयाबीनचे उत्पादन घेत असतो मात्र यावर्षी उन्हाळ्यात वेळी अवेळी अवकाळी पावसाचे आगमन झाले. त्यामुळे जमिनीत ओलावा कायम राहिला असं असलं तरी नागरण झाल्यानंतरही जमीन उन्हामध्ये तपणे आवश्यक असते.मात्र त्यामुळे जमिनीतील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.यावर्षी मात्र उन्हाळा मध्ये झालेल्या पावसामुळे हे बुरशीजन्य किडी आणि त्यांचा प्रादुर्भाव जमिनी मध्ये कमी झाला नाही.या रोगाचा प्रादुर्भाव येणाऱ्या सोयाबीन पिकावर पडेल आणि सोयाबीन पिकाची उत्पादन क्षमता कमी होईल याचा अनुमान घेऊन जिल्हा कृषी अधीक्षक श्री शंकर तोटावर यांच्या मार्गदर्शनाखाली मेडशी येथील कृषी सहाय्यक डी के रणवीर व विलास ढवळे यांनी सिजेंटा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने मेडशी ग्रामपंचायत कार्यालय येथे पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी याची प्रात्यक्षिक करून इत्यंभूत माहिती दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी बांधवांनी सोयाबीन,ज्वारी, उडीद, मूग हे पिके पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करूनच पेरावी असे आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.तसेच संजय पीटकर,नितीन केंद्रे हे सिजेंटा इंडिया प्रा लि चे कर्मचारी सह वल्लभ पाठक,संजयराव घुगे, राघल राठोड,अतुल घुगे,घनश्याम साठे,नितीन तायडे,बुद्धू गौरे,महेबुब गौरे, राजदार पठाण,शे अक्रम,अमोल तायडे, निशांत मेडशीकर,अजिंक्य मेडशीकर यांच्या सह मेडशी व परिसरातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
