अकोला येथील लव्हाळे भगिनीची उतुंग भरारी एक खेळात खिलाडी तर दुसरी शिक्षणात हुशा



प्रतिनिधी अन्सर शेख

अकोला येथील रामनगर मध्ये राहणाऱ्या दोन सख्या बहिणी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर स्वतःचा वेगळा ठसा समाजात उमटवत आहे. मोठी बहीण वैष्णवी लव्हाळे ही आपल्या धावण्याच्या स्पर्धेत खेळाच्या जोरावर अकोला जिल्हातील बुलेट ट्रेन म्हणुन सर्वानाच प्ररीचित आहे.तिच्याच पावला वर पाऊल देत तिची लहान बहीण रोशनी भगवान लव्हाळे हिने या वर्षी दहावीच्या परिक्षेत 97 टक्के गुण प्राप्त करत आपला वेगळा ठसा शिक्षण क्षेत्रात उमटविला आहे.वैष्णवी लव्हाळे हीच शिक्षण अकोलातील प्रसिद्ध आर एल टी कॉलेज मधून बी एस सी झाले असून तिला शिक्षणा मध्ये एवढा रस नाही.त्यामूळे तिला लहानपनापासून धावण्याची आवड असल्यामुळे त्यालाच आपलं ध्येय बनवत त्यातच आपलं भविष्य बनविन्याच माध्यम बनविल.आता पर्यंत तिने राज्य अंतर्गत व राज्य बाहेर झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक,द्वितीय अशे क्रमांक पटकावत खूप सारे पारितोषक मिळवले आहे.आणि समाजात आपण मुलगी असून मुला पेक्षा काही कमी नाही हे सिद्ध करून दाखवले.तर ह्यात तिची लहान बहीण रोहिनी  सुद्धा कमी नाही.तिला अभ्यासाची खूप आवड आहे.तीच शिक्षण अकोल्यातील प्रसिध्द माऊंट कारमेल शाळेत सुरू असून तिला यंदा दहावीच्या परीक्षेत लक्षणीय कामगिरी करत भरघोस यश संपादित करत 97 टक्के पर्यन्त मजल मारली.रोहिनीला मोठ होऊन सनदी लेखपाल बनायचं आहे तर वैष्णवी ला देशासाठी ओलंपिक मद्ये सुवर्ण पदक मिळविण्याचा मानस आहे.आणि त्यांचा ह्या यशा मागे त्यांना आई ममता भगवान लव्हाळे यांचा संपूर्ण सहकार्य व पाठिंबा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post