प्रतिनिधी अन्सार शेख
रिसोड : नगरपरिषेच्या मुख्याधिकारी नुकतेच सतीश शेवदा नियुक्त झाले असून त्यांनी आपला पदभार सांभाळला सतीश शेवदा यांची मंगरूळपी वरून रिसोडला बदली झालेली आहे. रिसोड चे तत्कालीन मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली असून गायकवाड यांची वाशिम येथे बदली झालेली आहे.गायकवाड़ यांनी पावणे दोन वर्ष रिसोड शहरात आपली सेवा प्रदान केली असून यावेळी त्यांनी विविध उपक्रम राबवून शहरातील स्वच्छता विकास कामे माझी वसुंधरा आधी उपक्रम राबवून शहरात ते नागरिकांच्या मनात चांगलेच घर निर्माण केले होते. नुकताच त्यांनी रिसोड शहरात प्रभाशाली अतिक्रमण मोहीम राबविली असून शहरातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला त्यांच्या बदलीनंतर सतीश शेवदा यांच्यावर अतिक्रमण उठवल्यानंतर त्या जागी पुन्हा अतिक्रम होऊ नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे आह.यासाठी त्यांनी निदान एक भरारी पथक नियुक्त करावे जेणेकरून पुनश्च अतिक्रमण होणार नाही व रस्त्यांना अतिक्रमाचा विळखा बसणार नाही अशी आशा रिसोडकरांना आहे. सतीश शेवदा यांनी वर्धा मंगरुलपीर या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे रिसोड शहरात त्यांचे पुढे अतिक्रमणाचे एक मोठे आव्हान असून त्यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षाही आहे.
