प्रतिनिधी अन्सार शेख
रिसोड : दिनांक 7 जून 2023 रोजी शिवमती उषाताई देशमुख यांच्या निवासस्थानी जिजाऊ ब्रिगेडची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजनाने आणि जिजाऊ वंदना घेऊन झाली .याप्रसंगी सुनिता कावरखे तालुका सचिव रिसोड यांनी जिजाऊ ब्रिगेडचे कार्याविषयी माहिती सांगितली. किरण कव्हर तालुका अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड रिसोड यांनी सुद्धा महिलांना संघटित होण्याची काळाची गरज आहे या अनुषंगाने प्रयत्न वाढवण्याची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले तसेच जिजाऊ ब्रिगेड चा विस्तार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.सोबतच महिलांनी श्रद्धा अवश्य ठेवावी परंतु अंधश्रद्धेपासून दूर राहावे याबाबत प्रबोधन केले आणि जिजाऊ ब्रिगेड फक्त विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून व्यापक स्वरूपात सर्वांना सोबत घेऊन चालणारे संघटन आहे याबाबत मार्गदर्शन केले.शिवमती शीतलताई बाजड यांनी महिलांना आरोग्याविषयी माहिती दिली. सवांद बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवमती योगिताताई देशमुख तर प्रमुख उपस्थितांमध्ये गायत्रीताई वाघ, मीनाताई खडसे, सावित्री यमगर, शीतलताई बाजड, वंदनाताई जाधव, हेमलताई जाधव, उषाताई शिंदे, सुनीताताई बोरकर, ऋतुजा कव्हर व इतर महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार शिवमती योगिताताई देशमुख यांनी व्यक्त केले .तसेच जिजाऊ ब्रिगेड मुळे महिलांना विविध ठिकाणी मान सन्मान मिळतो तसेच वैचारिक पातळी ही वाढते आणि आत्मविश्वास वाढतो त्या अनुषंगाने महिलांनी संघटित होणे गरजेचे आहे आणि जिजाऊ ब्रिगेड चा विस्तार करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
