अन्सार शेख प्रतिनिधी
रिसोड:गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी बांधलेले रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी सदन हे विपन्न अवस्थेत गेलेले आहे.
शेतकरी सदनात घाण कचरा व धूळ पडली असून याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी न होता सध्या यात भंगार पडले आहे. सदन व्यवस्थित साफसफाई करून शेतकऱ्यांसाठी खुले करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका निबंधक कार्यालय कडे केली आहे. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष गोपाल खडसे यांनी निवेदनात दिला आहे.
याबाबत अधिक असे की रिसोड बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या जीवावर चालते मात्र शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कुठल्याच मूलभूत सुविधा आजमितीस उपलब्ध नाही.
सुरुवातीच्या काळात काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी हे शेतकरी सदन बांधण्यात आले होते माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याला उठण्या बसण्यासाठी व आराम करण्यासाठी हक्काची जागा असावी म्हणून हे सदन होते
मात्र शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या या सदनात शेतकरी कमी आणि संचालक व राजकीय नेत्यांची चेली चपाटी यांचाच वावर अधिक होत होता. नंतर हा वावर गैरमार्गाने अधिक होत असल्याने हे सदन बंद करण्यात आले. आता हे सदन धूळ खात पडले असून नुकत्याच बाजार समितीच्या निवडणुका झाल्या या निवडणुका शेतकऱ्यांच्या नावावर मते घेऊन पार्ट्या निवडून आल्या निवडणुका संपून महिना लोटला तरी शेतकरी हिताच्या दृष्टीने स्वागत व सत्कार पलीकडे बाजार समितीने अद्याप कुठलेही ठोस काही केले नाही हे सदन शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित करून तात्काळ खुले करावे अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा एका निवेदनाद्वारे तालुकाध्यक्ष गोपाल खडसे यांचे नेतृत्वात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ते गजानन खंदारे यांचे मार्गदर्शनाखाली दिला आहे.
निवेदनावर गोपाल खडसे तालुका अध्यक्ष विजय झूंजारे तालुका संघटक इब्राहिम खान शहराध्यक्ष समीर पठाण गणेश गव्हाणे मंगेश गव्हाणे शंकर वानखेडे संदीप शिंदे यांच्या सह्या आहेत
