विखे-लंके समर्थकांमध्ये जाेरदार घाेषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण




प्रतिनिधी अफसर शेख



अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे डाॅ. सुजय विखे पाटील व राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके आमनेसामने आले. यावेळी दाेन्ही समर्थकांकडून जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दाेन्ही नेत्यांमध्ये चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली हाेती.

विखे आणि लंके हे आपआपल्या समर्थकांबराेबर जिल्हाधिकारी कार्यालयात आले हाेते. दाेन्ही नेते समाेरासमाेर येताच दाेन्ही बाजूने घाेषणाबाजी सुरू करण्यात आली. लंके यांच्या कार्यकर्त्यांनी भावी खासदार लाेकनेते लंके साहेबांचा विजय असाे, तर विखे यांच्या समर्थकांनी सुजय विखे साहेब तुम आगे बढाे, हम तुम्हारे साथ है, अशा जाेरजाेरात घाेषणा दिल्या. त्यानंतर आमदार लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, ”कोण आणि काय आलं, आम्ही काय लक्ष दिलं नाही, आम्हाला तेवढा वेळ पण नाही. दरराेज कलेक्टर ऑफिसला कोण येऊन बसतं, आम्ही लक्ष देत नाही, आम्ही काम करणारी माणसं, आम्ही कामाला महत्त्व देतो. लोकांना जे वाटेल ते पुढे समोर येईलच”, असा टाेला खासदार विखे यांना लगावला.

दुसरीकडे सुजय विखे म्हणाले, ”मला कुठल्याही घोषणेची माहिती नाही. कोण घोषणा देतो, ते कोणाची घोषणा देत होते. हे मला माहीत नाही. मी त्या भानगडीत पडत नाही. आपलं सर्वसामान्य नागरिकांचे काम करत राहायचे. ते आपण करतो”, अशी खाेचक टाेला लंके यांना लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post