(पत्रकार माधव तल्हा पालघर)
दिनांक 29 जून रात्री दोनच्या सुमारास ,पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रानशेत गावा मध्ये ,मुसळधार पावसात रात्रीच्या दोनच्या सुमारास राहते घर अती वारापाऊसामुळे कोसळले,त्या घरा मध्ये विधवा महिला राहत असून , तिचा मुलगा विटखाली दाबला गेला, असे दिसून आले, अश्या अवस्थेत शेजारी लोक धाऊन आली ,आणि,ढिगाऱ्यात अडकलेला मुलाल कसेतरी बाहेर काढून जवळच्या कासा सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले,डोक्याला आणि पायाला जबर मार लागला असून सुदय वाने प्राण वाचले,असे शेजारी असलेले लोक बोलत होती,
पुढील पंचनामा करण्या करिता गावचे तलाठी,ग्रामसेवक सरपंच सदस्य हे येणार आहेत,असे ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल बोलाडा बोलत होते,आणि भर पावसात घर कोसळले हि दुःखाची बाब असून त्या विधवा महिलेला ग्रामपंचायत कडून पेसामधून भरपाई मिळावी असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे,
