मालेगाव :उमेश लहाने
सौ सुशीलाताई जाधव विद्यानिकेतन वाशिम मध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. ज्योती भाकरे प्रमुख पाहुणे गणेश पांडे, दिलीप शिंदे, किशोर राजगुरू, शामराव गोरे आदी सर्व उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची आराध्य दैवत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत घेण्यात आले तसेच नव्याने प्रवेश घेतलेले सर्वच विद्यार्थ्यांचे औक्षण करून, पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भाकरे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण व त्या संदर्भात असलेले काही महत्त्वपूर्ण बाबी तसेच अभ्यासक्रमात झालेल्या बदला विषयी माहिती सांगितली आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रघुनाथ करवते यांनी तर आभारप्रदर्शन हिप्पी भिसडे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापिका ज्योती भाकरे शिक्षक अशोक ढोके,हीप्पी भीसडे, अनिल गोरे, राधेश्याम गवळी, रघुनाथ करवते,सागर जाधव, राधा साबळे ,जया आरु, किरण करणे ,गायत्री देशमुख शिक्षकेतर कर्मचारी गजानन कव्हर,शोभा पाचरे, देवकते आदी सर्व उपस्थित होते.
