घाटघरला विक्रमी सहा इंच पाऊस



 

अफसर शेख

 अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. पावसाने घाटघर व रतनवाडीला अक्षरशः झोडपून काढले आहे. घाटघर येथे विक्रमी सहा इंच पावसाची नोंद झाली आहे. रतनवाडीला साडेपाच इंच पाऊस पडला आहे.

 पाणी भंडारदरा धरणाच्या दिशेने झेपावले

शनिवारपासून (ता.२४) धरण पाणलोटक्षेत्रात मोसमी पाऊस सुरू आहे. त्यात दोन दिवसांपासून अधिक जोर वाढल्याने रतनवाडी, घाटघर, साम्रद, कोलटेंभे या भागाला अक्षरशः झोडपून काढले आहे. सतत सुरू असलेल्या पावसाने भातखाचरे तुडुंब भरली आहेत. डोंगरावरून पाण्याचे शुभ्र प्रपात कोसळत आहे. घाटघर येथील उर्ध्व धरण भरुन पाणी भंडारदरा धरणाच्या दिशेने झेपावत आहे. 

 रतनगडावरही धुव्वाधार पाऊस कोसळत असल्याने प्रवरामाई वाहती झाली आहे. तर डोंगदर्‍यांवरुन वाहणार्‍या पाण्यामुळे ओढे-नाले चांगलेच सक्रीय झाल्याने धरणातही नवीन पाण्याची हळूहळू आवक होत आहे. भात लागवडीयोग्य पाऊस पडल्याने लगबगही सुरू झाली आहे. कळसूबाई डोंगररांगेत पाऊस कोसळत असल्याने कृष्णवंती नदी वाहती झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post