आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत जिल्हा बँकेचे एक पाऊल पुढे : राधाकृष्ण विखे पाटील




प्रतिनिधी अफसर शेख

 नगर जिल्हा बँकेने मोबाईल बँकिंग अ‍ॅप सेवा सुरू करून बँकिंग स्पर्धेच्या युगात एक पुढचे पाऊल टाकले आहे. शेतकऱ्यास अधिकाधिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

 जिल्हा बँकेच्या मोबाईल अ‍ॅप उद्घाटन समारंभात ते बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के आदी उपस्थित हाेते.

*मंत्री विखे पाटील म्हणाले की* 

''आशिया खंडातील पहिली बँक म्हणून जिल्हा बँकेचा नावलाैकिक आहे. जिल्हा बँकेने शेतकरी, कारखानदार तसेच महिला बचत गटांना गरजेच्या वेळी कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे. येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर पत पुरवठा केला पाहिजे. मोबाईल बँकिंग अ‍ॅपमुळे दैनंदिन कामकाज हे सुलभ होईल.''

Post a Comment

Previous Post Next Post