अहमदनगर अफसर शेख
नगर जिल्ह्यातील सकल बौद्ध व आंबेडकरी जनतेच्या वतीने अक्षय भालेराव याच्या हत्येच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्राेश माेर्चा काढण्यात आला. अक्षय भालेराव युवकाचा खून खटला जलदगतीत न्यायालयात चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की
भालेराव यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे. जातीय धार्मिक भडकावू भाषणे करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, विविध मागण्यांसाठी आक्राेश करण्यात आला. ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, आर पी आय जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड सुमेध गायकवाड, सुरेश बनसोडे, किरण दाभाडे, सोमा शिंदे, संजय कांबळे आदी जिल्हाभरातून आंबेडकरी जनता माेठ्या संख्येने माेर्चात सहभागी झाली हाेती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदा गावात साजरी केली. त्याचा राग मनात धरून गावातील आरोपींनी नांदेड येथील बोंडार गावातील अक्षय भालेराव याची हत्या केली हाेती. भालेराव कुटुंबाला सरकारने लवकरात-लवकर न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
