व्हॉइस ऑफ मीडिया रेडिओ विंग च्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी ज्योतीताई इंगळे यांची निवड




मालेगांव / सुरज अवचार 


       देश पातळीवर काम करणाऱ्या वाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन ११ जून 2023 रोजी नाशिक येथे पार पडले. व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे व तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन ज्योतीताई इंगळे यांची वाशिम जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रेडिओ विंगच्या माध्यमातून या क्षेत्रात कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याची मशाल धगधगती ठेवावी असा नाशिक येथे आयोजित व्हाईस ऑफ मीडिया रेडिओ विंगच्या राज्य अधिवेशनात




 मान्यवराकडून सूर उमटला. यामध्ये रेडिओ पत्रकारांना येणाऱ्या विविध समस्या संदर्भात विचार मंथन झाले. पत्रकारांना दहा लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले .तसेच रेडिओ पत्रकारांना श्रमिक कामगारांचा दर्जा देण्यात आला. नवनियुक्त पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी यांना यावेळी नियुक्तीपत्र,सन्मानचिन्ह, ओळखपत्र, दहा लाख रुपयाची विमा कार्डचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. रेडिओ क्षेत्रासह आपापल्या कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना विमा कवच, मुलांचे शिक्षण ,घरकुल, नवे तंत्रज्ञान कौशल्य ,सेवानिवृत्तीनंतर आयुष्याचेनियोजन ,अधिस्वीकृती यासह विविध विषयावर चर्चा करण्याची वेळ आली असल्याचे विचार वाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी नमूद केले. नवरत्नांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शासन आणि प्रशासन स्तरावर रेडिओ माध्यमातील प्रश्नांचा तात्काळ पाठपुरवठा केला जाणार आहे असे मत रेडिओ इन चे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. कम्युनिटी रेडिओच्या क्षेत्रात स्वातंत्र्यानंतर कधीही इतकी एकजूट बघायला मिळाली नव्हती. व्हॉईस  ऑफ मीडियाच्या छत्राखाली एकजूट बघायला मिळाली असे मत रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद यांनी व्यक्त केले. देवानंद इंगोले महाराष्ट्र राज्य प्रवक्ता व्हाईस ऑफ मीडिया रेडिओ विंग, संदीप देशमुख महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व्हाइस ऑफ मीडिया रेडिओ विंग, महाराष्ट्र राज्य सदस्य सपना डोंगरे, अश्विनी इंगळे यांना सन्मानित करून प्रमाणपत्र देण्यात आले. ज्योतीताई इंगळे यांची व्हाईस ऑफ मेडिया रेडिओ विंगच्या वाशिम जिल्हा अध्यक्षपदी निवड करून यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आले . राज्यस्तरीय अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे. देवानंद इंगोले तसेच आर. जे. संदीप देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. जे. सायली जाधव आणि आर. जे .ज्योती इंगळे यांनी पार पाडले .

Post a Comment

Previous Post Next Post