प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोळगाव गेल्या सहा वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

 



प्रतिनिधी

विजय शेंडगे मो नं 9834499433


कोळगाव बुद्रुक येथे गेल्या सहा वर्षापासून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ची बिल्डिंग बांधून धूळ खात पडलेली आहे शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून ही बिल्डिंग उभी केली परंतु आज सहा वर्ष होऊन सुद्धा हे उपकेंद्र सुरू झालेले नाही आज या उपकेंद्राचा उपयोग जुगार खेळणे संडास ला जाणे यासाठी केला जातो परंतु याकडे आरोग्य विभागाचे संपूर्णपणे दुर्लक्ष आहे जर हे उपकेंद्र सुरू करायचे नव्हते तर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्चून बिल्डिंग बांधायची काय गरज होती असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन दिले



 परंतु आरोग्य विभाग व शासन याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि या उपकेंद्रासाठी देशातून कोणता भटजी येऊन या उपकेंद्राचे उद्घाटन करणार आहे असा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी ला मतदार हा राजा वाटतो परंतु सहा वर्षापासून कोणत्याच लोकप्रतिनिधींनी



 कोळगाव उपकेंद्राचा प्रश्न लावून धरला नाही आणि तो निकाली ही काढला नाही त्यामुळेच निवडणुका आल्या की मतदार राजा आणि निवडणूक संपला की भिकारी राजा अशी स्थिती कोळगाव  झालेली आहे, जर हे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर सुरू झालं नाही तर कोळगाव येथील गावकरी यांनी मोठ्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post