प्रतीक्षा ने रांगोळीतून हुबेहूब साकारली विठ्ठलाची प्रकृती





शेख अन्सार


रिसोड : रिसोड येथील रहिवासी रांगोळी चित्रकार प्रतीक्षा साबळे ने आज दिनांक 29 जून रोजी आषाढी एकादशी निमित्ताने येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये रांगोळीतून विठ्ठल व वारकऱ्यांची हुबेहूब प्रतिमा साकारून भाविकांचे लक्ष वेधले.सदर प्रकृती बघून येणाऱ्या जाणाऱ्यांना बघणाऱ्यांना सेल्फी व फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. सदर रांगोळीतून काढलेली प्रतिमेचे भक्तांकडून भरभरून कौतुक केले जात आहे. प्रतीक्षा ला लहानपणूपासूनच रांगोळीच्या



 माध्यमातून विविध प्रकारची चित्रे काढण्याचा छंद होता. तिने तिच्या कलेला हळूहळू वाव दिला. प्रतीक्षा चे माध्यमिक शिक्षण हे येथील भारत माध्यमिक विद्यालयामध्ये झालेला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरचा पांडुरंग यांची रांगोळी करण्याची इच्छा व मानस होता तिने येथील संत गजानन महाराज मंदिर मध्ये सहा बाय चार या साईज मध्ये भव्यदिव्य आकारात काढलेली रांगोळीला जवळपास 15 ते 16 तास लागले. यासाठी एकूण तीन किलो विविध रंगाची रांगोळी लागली. सदर रांगोळी ही मंदिरात मुख्य आकर्षण केंद्र ठरली. आषाढी एकादशी निमित्त येणारे भाविक रांगोळीच्या अंतकरणातून स्तुती करत होते व फोटो काढून सेल्फी घेत होते. प्रतीक्षा च्या कलागुणांना वाव मिळावा

यासाठी गजानन महाराज संस्थानचे संस्थांचे विश्वस्त गोविंद बगडे यांनी तिचा सत्कार केला. प्रतीक्षाने पुढे भविष्यातही अशा प्रकारची रांगोळी काढणार असल्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी कलाशिक्षक संतोष उखळकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post