आषाढी दिंडीतून बालचमूंचा वृक्ष व ग्रंथ जागर



                                       रोहीत परीट ,कोल्हापूर  प्रतिनिधी 

साजणी: 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर  जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज,संत सोपानदेव तसेच इतर संतांच्या पालख्या पायी पंढरपूरला जातात.आषाढी एकादशी वारीचे औचित्य साधून कुमार व कन्या विद्या मंदिर साजणी जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेतील बाल वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे दिंडीमध्ये बाल वारकऱ्यांनी पालखी सोहळ्यासह वृक्षदिंडी आणि ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते.

समाजासाठी वृक्ष आणि ग्रंथ यांचे असलेले महत्व घोषणेतून तसेच फलक लेखनातून  सांगितले. दिंडी ढोल ताशांच्या गजरामध्ये टाळ -मृदुंगांच्या तालामध्ये झाडे लावा झाडे जगवा,प्राणीमात्रांवर दया करा, घरोघरी वाचनालय असू द्या, वाचाल तर वाचाल,घरोघरी नवीन कपडे नसतील तरी चालतील पण नवीन पुस्तके असलीच पाहिजेत.वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. 'चला तर मग झाडे लावू या ' 'सजीव वाचवूया ' चे फलक घेवून गावातून फेरी काढण्यात आली.गावातील मारुती मंदिरासमोर मुलांनी एकत्रित येत लेझीम पथकाने आणि टाळकऱ्यांनी  रिंगण सोहळा साजरा केला.

दिंडीत विठ्ठल रुक्मिणी,संत वेषभूषेत मुले टाळकरी व विणेकरी अशा पारंपरिक वेशभूषेत दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.यावेळी गावातील महिला आणि ज्येष्ठ लोकांनी पालखीचे पूजन केले. पालखीमध्ये वृक्ष आणि ग्रंथ दिंडी पाहून सर्वांना या बाल वारकऱ्यांचे कौतुक केले. पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि पादुका ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी कुमार शाळेचे मुख्याध्यापक - देशमुख सर यांनी  वृक्षदिंडी व पालखी सोहळ्याबद्दल माहिती दिली. तसेच कन्या शाळेचे मुख्याध्यापक- जमादार सर यांनी ग्रंथ दिंडी विषयीचे  महत्त्व सांगतिले.

या दिंडी सोहळ्यासाठी दोन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,सरपंच,उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,शिक्षकवृंद,पालक आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले.या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post