अफसर शेख
अहमदनगर महानगरपालिकेच्या सिद्धीबाग येथील जलतरण तलावाचे 'स्व.धर्मवीर माजी आ.अनिलभैय्या राठोड जलतरण तलाव’ असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेविका सुरेखा कदम, शाम नळकांडे आदी उपस्थित होते.
महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या
नगर शहराच्या विकासात स्वर्गीय अनिल राठोड यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या कार्याची आठवण भावी पिढीला राहावी, यासाठी येथील जलतरण तलावाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. पुढील काळात या तलावाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी योगा हॉल, मिडिटेशन, इनडोअर व्यायाम, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था तसेच तलावाची लांबी वाढविण्यात येणार आहे.
गणेश कवडे म्हणाले
नगर शहर आणि अनिलभैय्या राठोड हे समीकरण होते. जलतरण तलावाला ‘स्वर्गीय अनिलभैय्या राठोड’ यांचं नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी कुलकर्णी अॅकेडमीच्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या जलतरणपटूंचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
