प्रतिनिधी अन्सार शेख
रिसोड : तालुक्यातील कवठा येथे महसूल मंडळ कवठा चे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवठा गावाच्या सरपंच अनिता सावसुंदर ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती रिसोड च्या तहसीलदार सौ प्रतीक्षा तेजनकर,पंचायत समिती सदस्य गणेश हरिमकर उपस्थित होते तसेच कवठ सर्कल मधील सर्व सरपंच पोलीस पाटील हजर होते लाभार्थ्यांना श्रवण बाळ संजय गांधी योजना उत्पन्न दाखले दुय्यम राशन कार्ड महसूल विभागामार्फत वाटप करण्यात आले आभा अंतर्गत कार्ड फेरफार सात बारा वाटप करण्यात आले तर शिक्षण विभागाकडून मुलांना गणवेश वाटप व पुस्तक वाटप करण्यात आले ग्राम पन्चायत कडून जन्म मृत्यू दाखले वाटप करण्यात आले तसेच पशुसंवर्धन विभाग पंचायत विभाग यांचेकडून सुद्धा लाभ देण्यात आले शासनाच्या प्रत्येक विभागाने नागरिकांच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन लोकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा त्यासाठी प्रशासनाची लागेल ती मदत देऊ असे आश्वासन तहसीलदार सौ प्रतीक्षा तेजनकर यांनी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवठा गावाचे ग्रामसेवक यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तलाठी स्वप्नील धांडे यांनी केले
