पंढरीची पायी वारी चालत असताना लोणी काळभोर मधील एका वारकऱ्याचा हृदयाविकराच्या झटक्याने मृत्यू...!

 



तौफिक शेख प्रतिनिधी

लोणी काळभोर: पंढरीची पायी वारी चालत असताना लोणी काळभोर मधील अंबरनाथ रामदारा शिवालय प्रासादिक दिंडी मधील वारकरी पंढरीनाथ काशिनाथ कामथे ( वय ६३ ) यांचा हृदय विकराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला असून लोणी काळभोर परिसरामध्ये त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.२१ जून रोजी त्यांना पायी वारी मध्ये चालत असताना इंदापूर या ठिकाणी अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकारी वारकऱ्यांना या बाबत कळवले असता त्यांच्या सहकारी वारकऱ्यांनी त्यांना इंदापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, परंतु त्यांची प्रकृती खालवत चालल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हलवण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना दौंड येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले, परंतु तेथेही उपचाराची सुविधा नसल्यकारणाने त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये दाखल केले, परंतु त्यांची प्रकृती जास्त खालवल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान दुर्दवी मृत्यू झाला. 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या "विठ्ठल रुखमाई वारकरी विमा छत्र योजनेतून" मदत मिळण्याची मागणी या वेळी वारकरी संप्रादयामधून होताना दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post