प्रतिनिधी माधव तायडे
कारंजा.आज दि.11 जून रोजी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची बैठक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अध्यक्ष बंडू भाऊ इंगोले,ज्येष्ठ पत्रकार विजय भड,तालुका उपाध्यक्ष प्रा.दिनेश रघुवंशी याची उपस्थिती होती .
बैठकीत नियोजित विषयावर सविस्तर चर्चा होऊन खालील कृती कार्यक्रम ठरविण्यात आला.
दिनाक १जुलै २०२३ रोजी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्याच्या आई वडिलांचा आणि विद्यार्थ्याचा सत्कार करण्याचे ठरले त्यात वर्धा येथील नितेश कराळे सर यांची उपस्थिती बाबत चर्चा करून त्याच्या तारिक निश्चित करण्याची जबाब दारी पत्रकार विजय खंडार यांनी स्वीकारली तर पत्रकार भावनांच्या निधी बाबत पालक मंत्री संजय राठोड याचेची बोलून निधी मंजूर करण्याची जबाब दारी पत्रकार गुणवंत राठोड,जागेबाबत चौकशी आणि न. प.मध्ये मागणी करणे ठराव पारित करून घेणे ही जबाब दारी जिल्हा अध्यक्ष बंडू भाऊ इंगोले ,तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे यांनी स्वीकारली,वार्षिक सभासद फी वाढविण्याबाबत पत्रकार संदीप कुऱ्हे यांनी मांडलेला ठराव सर्वानुमते मान्य करून अनेकांनी वार्षिक सभासद फी ५००₹ कर्यकरणीचे सचिव मोहंमद मुन्नी वाले यांचेकडे जमा केले.या वार्षिक सभासद वाढ फी ला पत्रकार संपादक रामदास मिसाळ यांनी अनुमोदन करून मान्यता मिळविली.यात आज पत्रकार दामोदर जोधाळेकर,दीपक इंगळे,मोनाली गणवीर,विनोद गणवीर ,गजानन टोंपे,विजय खंडार आदींनी फी जमा केली .यात पत्रकार विजय भड यांनी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.व पत्रकार संम्मान योजना सुद्धा सुरु करण्याचे ठरविन्यात आले सर्व सदस्याना नवीन ओळख पत्र लवकर देण्यात येईल या बैठकीत कालूभाई तवांगड,आशिष धोंगडे, ज्ञानेश्वर वर्घट,उषाताई नाईक,संपादक महेंद्र गुप्ता,संपादक पवनकुमार कदम,महादेव कटोळे,दीपक इगळे ,रामदास मिसाळ,संदीप कूरहे,दामोदर जोधलेकर,विजय खंडार,एम डी मुन्नीवाले, विनोद गणवीर, हाफिज भाई जिनवर तायडे,यांचे सह अनेकांनी बैठकीत सहभाग नोदविला.
