रिसोड ता 11
रुपेश बाजड:
आमदार निधी मधून शहराला सुरक्षा मिळावी या दृष्टीतून संपूर्ण शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते मात्र ते कॅमेरे बंद झाल्याने गुन्हेगारी व चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे, शहरातील काही अतिसंवेदनशील भागामध्ये व मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, मात्र तेच कॅमेरे आता बंद पडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने बसवण्यात आलेले कॅमेरे बंद पडल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे रिसोड शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे गेल्या आठवड्याभरामध्ये भर दिवसा चोरी झाल्याच्या घटना घडल्या यात जर सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर चोरांचा शोध पोलिसांना घेताना सहज सोपे झाले असते. मात्र तसे झाले नाही. अजूनही त्या चोरट्यांचा शोध घेण्यात आला नाही त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरात गुन्हेगारीवर व इतर घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा म्हणून महत्त्वपूर्ण असलेले शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहे याकडे बऱ्याच दिवसापासून संबंधिताचे दुर्लक्ष असल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आजच्या काळात गुन्हेगारांना पकडण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा महत्त्वाचा रोल असतो गुन्हेगाराला पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोठ्या प्रमाणात मदत होते. सीसीटीव्ही कॅमेरा ची पोलिसांना मोठ्या प्रमाणात मदत होत असते त्यामुळे बंद पडलेले कॅमेरे सुरू करावे अशी मागणी वारंवार होताना दिसत आहे.
कॅमेऱ्याची तोडफोड 40000 च्या वर लोकसंख्या असलेल्या रिसोड शहराच्या सुरक्षेसाठी आमदार निधी अंतर्गत सन 2019 साली अति संवेदनशील भागामध्ये पशहरातील मुख्य ठिकाणी 38 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संपूर्ण डाटा संकलन प्रणाली पोलीस स्टेशन रिसोड येथे बसवण्यात आली होती परंतु या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची योग्यरीत्या देखभाल करण्यात आली नाही कॅमेरे असलेल्या ठिकाणी बॅनर लावण्याच्या नादात कॅमेऱ्याची तोडफोड केले गेल्याने अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहे त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करून त्या ठिकाणी बॅनर न लावू देता योग्य ती निगराणी घेणे अत्यंत गरजेचे आहे
सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे चिडीमारी, चोरीचे प्रमाण व इतरही बाबींनी डोके वर काढले असून कॅमेरे सुरू झाल्यास वरील सर्व गोष्टी कमी होतील अशी आशा सर्वसामान्यांना आहे...
रिसोड शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याचे टेंडर झाले आहेत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होतील अशी माहिती मुख्याधिकारी नगरपरिषद रिसोड यांनी दिली आहे
सतीश शेवदा
मुख्याधिकारी नगर परिषद रिसोड