खेर्डा येथे सरपंच पतीवर प्राणघातक हल्ला .दारुवर बंदी घालण्याची ग्रामस्थांची मागणी .





कारंजा प्रतिनिधी / अशोकराव उपाध्ये .

कारंजा तालुक्यातील ग्राम खेरडा येथील सरपंच अर्चना अमोल बिजवे यांचे पती अमोल बिजवे यांच्यावर गावात 11 जून रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास गावातील एका इसमाने चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले .गावातील नरेंद्र गुल्हाने यांच्या मुलाच्या लग्नाची वरात मिरवणूक सुरू असताना गावातील संजय पुंडलिक शिरसाठ या व्यक्तीने सरपंचपतीअमोल बिजवे यांच्यावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले . याप्रसंगी गावातील नातेवाईकांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी इतरही लोकांना काही प्रमाणात किरकोळ मार लागला .जखमी अमोल बिजवे यांना उपचाराकरिता कारंजा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले . घटनेची गांभीर्य लक्षात घेता कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार  यांनी तात्काळ आरोपीला अटक केली . घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे गावात मोठ्या प्रमाणात दारू विकल्या जात असल्याने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे .  गावात विकल्या जाणाऱ्या दारूवर  बंदी घालावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post