जउळका येथे महिलांच्या कर्तुवाला सलाम, पारितोषिक देउन केला सत्कार




मालेगाव / सुरज अवचार

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे येथे गावात उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या दोन महिलांचे बुधवारी (ता.३१) येथील ग्रामपंचायत भावनात आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुर्वणा रमेश लांडगे, उपसरपंच गजानन चोंडकर ग्रामसेवक करवते मॅडम,  ग्रा.पं.सदस्य लक्ष्मण सावळे, मनोज काळे, किशोर मंत्री, अर्चना इंगळे , सुनंदा अवचार , सुनिता पाटिल, शोभाबाई पाटिल,  सामाजिक कार्यकर्ते रमेश लांडगे , भरत पोधाडे, सुरेश पाटिल, राजु गर्दे , देविदास ढवळे, माजी,पंचायत समीती सदस्य लालाजी चव्हाण, अंगणवाडी सेविका शिला भगत , रेखाबाई इंगळे, चंद्रकला वैद्य, आशा सेविका बालाबाई अवचार,  सुरेखा इंगळे, छाया पांडे, व गावातील नागरिक रुपेश लढ्ढा, शंकर ढवळे, पवन वाळले, प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पर्पण करून करण्यात आली. यावेळी मागच्या वीस वर्षांपासून गावात महिला बचतगट चळवळीच्या माध्यमातून महिलांना साक्षर व आत्मनिर्भर बनविण्यासाठी मोलाचे कार्य करणाऱ्या वर्षाबाई अवचार, सत्यभामा गजबे ह्या महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना मदत करणाऱ्या वर्षाबाई अवचार व सत्यभामा गजबे यांचा शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पाचशे रुपये देऊन सत्कार करण्यात आला. सदर महिलांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आशा सेविका बालाबाई अवचार , छाया पांडे, सुरेखा इंगळे, यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल काटेकर यांनी केले तर आभार सिताराम ढवळे, यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी ग्रा. प. कर्मचारी सिताराम ढवळे ,जंगली रेघीवाले , सुनिल धोंगडे, राहुल काटेकर , डिंगाबर इंगळे, यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post