कारंजा प्रतीनीधी / अशोकराव उपाध्ये
खातेदारांना बँकेचे डिजीटल ट्रॉन्सेक्शन करता यावे करीता ग्रामपंचायत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा काजळेश्वरचे संयुक्त विद्यमाने डिजीटल कार्यशाळा शनीवारी ग्रामपंचायत भवन येथे आयोजीत होती .सभेचे अध्यक्षस्थानी सरपंच नितीन पा . उपाध्ये तर प्रमूख उपस्थितीत उपसरपंच तैसीमभाई ;समाजसेवी सुभाष पा . उपाध्ये ;डॉ. शे मुन्त जीम ;गजानन भड;दिलीप गावंडे ;महिला बचत गटाच्या रेखा लांडे ;खवि संचालक विनोद उपाध्ये ;सोसायटी अध्यक्ष सुभाष उपाध्ये इत्यादी मान्यवर व्यासपीठावर होते .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार व्हावे करीता बँकेचे व्यवहार डिजीटल करण्या हेतू खातेदार डिजीटल साक्षर व्हावे करीता ही कार्यशाळा असल्याचे प्रास्ताविकातून
शाखाधीकारी संजय म्हस्के म्हणालेत . बँक कर्मचारी अक्षय पाटील यांनी ऐटीम ;फोनपे ;भीम तसेच आर्थिक मोबाईल बँकींगची माहीती कार्यशाळेत दिली . प्रत्येकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनसामान्यासाठी आनलेला वार्षिक २०रू . व४२३रू .चा विमा करून स्वताला व परीवाराला सुरक्षीत करुन ध्यावे असे सूचवीत बँकेने गावसाठी एटीम मशीन देऊन खातेदारांची सोय करावे असे अध्यक्षीय भाषणातून आपले विचार व्यक्त केलेफ कार्यक्रमाचे संचलन उमेश निंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय पाटील यांनी केले . कार्यक्रमाला गावचे प्रतिष्ठीत तसेच ग्रामस्थ ;खातेदार यांची उपस्थीती होती .
