वटपौर्णिमेनिमित्त रांजणगाव मधील महिलांची वटवृक्ष पूजा

 


अहमदनगर प्रतिनिधी शिवाजी गजभार 

रांजणगाव गणपती येथे वटपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वटवृक्षाचे पूजन करून हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा अशी वड वृक्षाला प्रार्थना केले हिंदू शास्त्रानुसार वडाच्या व पिंपळाच्या झाडाची खूप महत्त्व आहे हे वृक्ष सतत वातावरणात ऑक्सिजन सोडण्याचे काम करतात त्यामुळे त्यांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे तरी या वडपौर्णिमेला सर्वांनी असा संकल्प करू की प्रत्येकाने यावर्षी एक तरी वड किंवा पिंपळाचे झाड लावु

विदेशामध्ये कौटुंबिक परिस्थिती ढासळली असताना भारतातील माता स्त्रिया हाच पती जन्मोजन्मी मिळावा यासाठी प्रार्थना करतात अशा समस्त महिलांना व मातांना प्रणाम दैनिक लोक संघर्ष तर्फे सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

Post a Comment

Previous Post Next Post