अहमदनगर जिल्हा आरटीओ कार्यालयाकडून हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू

 



अहमदनगर अफसर शेख 


 

मोटर वाहन कायद्यातील कलम 129 व 194ड  मधील हेल्मेट वापरासंबंधी तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी  अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी चौकात चौकात आरटीओ कर्मचाऱ्यांची कारवाईसाठी  नजर राहणार आहे नागरिकांना सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे  धावपळीच्या युगामध्ये स्वतःची संरक्षण कसं करायचं हा प्रत्येक माणसाला विसर पडला आहे अहमदनगर जिल्ह्यात सन 2022 व 2023 मधील घडलेल्या अपघाताचे तुलनात्मक विश्लेषण केले असता या वर्षामध्ये घडलेल्या एकूण रस्ता अपघातामध्ये टू व्हीलर व पादचायांचे प्रमाणे सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे सदर अपघाता पैकी 70 ते 80 टक्के अपघात हे फक्त दुचाकी व पदचऱ्यांचे आहेत ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय चिंताजनक आहे वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे व बहुतांशी दुचाकी वाहनांचे अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत्यू पावणारे वाहनस्वर हे हेल्मेट शिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे त्यामुळे हेल्मेट वापरणे संबंधित व अंमलबजावणी विषयक व्यापक मोहीम अहमदनगर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे आरटीओ कार्यालयाकडून लोकांना आवाहन करण्यात येत आहे की मोटर सायकल चालवताना आपल्या स्वतःची संरक्षण साठी हेल्मेट वापराव जेणेकरून जीवितेस होणारा धोका टाळण्यात मदत होईल आज प्रत्येक ठिकाणी मोटरसायकलचे जास्त प्रमाणात अपघात होत आहेत बरेचसे अपघात हे हेल्मेट नसल्यामुळे अनेकांचे प्राण गमवावे लागले आहेत आता अहमदनगर जिल्ह्यामधील आरटीओ कार्यालयाकडून ज्या लोकांकडे हेल्मेट नसेल अशा लोकांना कारवाई होणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या जीवतेचे शासन जे काळजी घेत आहे हेल्मेट सक्ती अभियानाला प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्तपणे  सहभागी होऊ आपण नागरिकांनी करायचा आहे असं आव्हान श्रीमती उर्मिला पवार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सर्व नागरिकांना करण्यात आला आहे

Post a Comment

Previous Post Next Post