मुंगळा प्रतिनिधी
जेव्हा महिलांना घरातून बाहेर पडणे अशक्य होते त्यावेळी अठराव्या शतकात राष्ट्रनिर्मितीचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कामगिरीच्या इतिहासाचा अभ्यास करून धनगर समाजातील तरूणांनी विविध ज्ञानाच्या प्रातांत प्रगती करण्याची गरज आहे’, असे मत सौ.रंजना बळीराम बेंगाळ यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी दि.३१ हे रोजी मालेगाव तालुक्यातील रेगाव येथे ‘अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संरपंचा सौ. रंजना बळीराम बेंगाळ होत्या तर प्रमुख उपस्थितीत माजी संरपंचा सौ.रत्नमाला गणेश थिटे, सामाजिक कार्यकर्ते विजय शेंडगे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तेलचित्राचे विधिवत पूजन करून हार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत राजे मल्हार मित्र मंडळाचे अध्यक्ष बबन मसाराव बेंगाळ व उपाध्यक्ष रामेश्वर गणेश थिटे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले सामाजिक कार्यकर्ते विजय शेंडगे यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हणाले की, आजच्या घडीला राजकारणात धनगर समाजाचे प्रतिनिधित्व क्वचितच दिसत आहे. हे चित्र बदलण्यासाठी धनगर समाजातील तरुणांनी समाजसुधारकांच्या विचार आत्मसात केले पाहिजे. ज्ञानाच्या क्षेत्रात तरूणांनी चांगली कामगिरी करत उद्योजक, इतिहासकार, व्यावसायिक, शिक्षक, संशोधक व्हावे. अहिल्यादेवी ह्या कुशल प्रशासक, योध्या होत्या. समाजबांधवांनी जयंतीनिमित्त अहिल्याबाई चे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भागवत थिटे, विनायक थिटे, भास्कर मस्के, गंगाधर कोकरे, गजानन थिटे, विश्वाबंर थिटे, अनिल थिटे, विनायक बेंगाळ, विकास बेंगाळ, संतोष बेंगाळ, वैभव आंधळे, शाम आंधळे, संदिप आंधळे, अभि थिटे, नारायण थिटे, जनार्दन नरोटे, पवन थिटे, विकास थिटे, पंडीत कोकरे, गणेश नरोटे, ज्ञानेश्वर थिटे, सचिन कोकरे, तुकाराम थिटे, रवि पोले आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर गणेश थिटे यांनी केले. तर आभार हिमंत माणिक थिटे यांनी मानले.
