*मालेगाव / सुरज अवचार :
आज ( ता ) १३ जुन रोजी वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुका महिला कार्यकारिणीची सभा राज्य महासचिव मा.अरुंधती ताई शिरसाट यांच्या आदेशाने मालेगाव येथे संपन्न झाली.
गाव तिथे महिला शाखा या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात आले. मा. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार उपलब्धता शिबिर आयोजित होणार आहे. या शिबिरास उपस्थित राहून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे असे मत किरण ताई गिऱ्हे राज्य सदस्य यांनी व्यक्त केले.
या वेळी ग्रामीण भागातील बहुसंख्य महिला उपस्तित होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सदस्या किरण ताई गिऱ्हे होत्या सभेच्या अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी च्या जिल्हा अध्यक्ष ज्योतीताई इंगळे ह्या होत्या. जिल्हा महासचिव प्रतिभा अंभोरे तालुका अध्यक्ष वंदना गायकवाड, सुकेशिनी गायकवाड, वर्षा वानखेडे, सिंधूताई सरकटे, तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार, तालुका महासचिव राजू भाऊ जमधाडे जिल्हा उपाध्यक्ष बाळूभाऊ खंडारे,त्रगजानन गव्हांदे लक्ष्मण ताजने हे होते यावेळी महिलांची सभासद नोंदणी करून पक्षाचे सभासद केले. तसेच तालुका कार्यकारिणीला पुढील कामाचे नियोजन देण्यात आले.
