मालेगाव येथील नूर फातमा बहुद्देशीय तर्फे दहावी बारावी मध्ये उर्दू विभागातील विद्यार्थ्यांचा सत्कार

 


मालेगाव प्रतिनिधी शिवकुमार घुगे

मालेगाव येथे नूर फातमा बहुद्देशीय संस्था, रजि. क्र. F-10740/19

च्या द्वारे आयोजित दहावी, बारावी मध्ये उर्दू विभागातील विद्यार्थांचा सत्कार व मार्गदर्शन चा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16/6/23 रोजी चे सायंकाळी 7 वा ते 10 वा पर्यंत अल अजीज फंक्शन हॉल मध्ये पार पडला. सदर कार्यक्रम मध्ये अध्यक्ष स्थानीय. श्री. शौकत शेख साहेब रिटायर्ड DCO जिल्हा मध्यवर्ती बँक अकोला हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. मोहम्मद शकील इंजी सर, डायरेक्टर, P.A.I. मल्टिमिडीया प्रा. लि. आजम कॅम्पस, पुणे व डायरेक्टर, इकरा अकॅडमी ऑफ एक्सलेन्स अकोला. व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून श्री. आय. एच. पठाण सर, वाशिम संचालक करियर अकॅडमी हे उपस्थित होते. सदर कार्यकर्माकरिता उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शौकत शेख साहेब यांचे स्वागत श्री. अब्दुल साजीद यांनी, श्री. मोहम्मद शकील सर, यांचे स्वागत मुबशशिर शेख, श्री. आय. एच. पठाण सर यांचे स्वागत फहीम मिर्झा व बुशरा मॅडम यांचे स्वागत हिना कौसर यांनी शाल गुच्छ देवून स्वागत केले. सदर कार्यकर्माची सुरुवात श्री. ताजोद्दिन खतीब सर यांनी कुराण पठण व श्री. गफ्फार गाझी सर यांनी नात ए रसूल पठण करून केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. फारूक ज़मन सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये श्रीमती. हिना कौसर मुबशशिर शेख अध्यक्षा, नूर फात्मा बहुउद्देशीय संस्था, वाशिम म्हणाल्या की, आम्ही वाशिम शहरात प्रथमच, उर्दू माध्यमाच्या 10 वी. 12 वी मध्ये उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचे दृष्टिकोन नजरे पुढे ठेवून स्वागत व करियर गाईडन्स चे कार्यक्रम आयोजित केले आहे. भविष्यात सुद्धा आम्ही आमचे संस्थेचे माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्या करिता व समाजाच्या विकासासाठी उपक्रम राबवू असे म्हणून उपस्थित विद्यार्थांना संबोधित करताना म्हणाल्या की, शिक्षण घेतांना येणाऱ्या अडचणीला न जुमानता आपण आपले लक्ष शिक्षणावर केंद्रित करून शिक्षण क्षेत्रामध्ये आपले व आपले समाजाचे नाव लौकिक करावे. हाच कार्यक्रम घेण्याचा उद्देश आहे. तदनंतर श्री. पठाण सर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले व गोर गरीब गरजू विद्यार्थांना जर आमचे अकॅडमी मध्ये प्रवेश घेण्यास पैश्याची अडचण असेल तर आम्ही त्यांना कोणतीही फीस न घेता पूर्णपणे मोफत शिक्षण देवून समाजाचे गरीब विद्यार्थांना घडवून समाज कार्य करू असे म्हणाले. शेवटी मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. शकील इंजिनियर सर अकोला यांनी विद्यार्थांना एक ती दीड तास संपूर्ण करियर गाईडन्स बाबत मार्गदर्शन केले उपस्थित विद्यार्थ्यांनी व आलेले त्यांचे पालकांनी मन लावून सादर केलेले मार्गदर्शन ऐकून त्यांचे सोबत वैयक्तिक चर्चा सुध्दा केली, आलेल्या सर्व 10 वी 12 वीतले उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हिना कौसर यांनी पुष्प गुच्छ देवून स्वागत केले व त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देवून कार्यक्रमाला आलेले सर्व शिक्षक, पालक यांनी आपले वेळात वेळ काढून आमचे निमंत्रणला मान देवून उपस्थित राहिल्या बद्दल आभार व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post