मालेगाव :उमेश लहाने
मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे परिसरातील सदैव गावकऱ्यांचा रस्त्यासाठी संघर्ष होत आलेला आहे वाशिम जिल्हा निर्मिती पासून ते आजपर्यंत अर्थसंकल्पात योजनेअंतर्गत तरतूद केल्या जाते मात्र लोकप्रतिनिधींच्याऊदासिन कारभारामुळ तसेच तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेच योग्य वर्चस्व नसल्यामुळे आज रोजी सर्वच्या सर्वच योजना धुळखात निर्द अवस्थेत पसरल्या आहेत.
यापूर्वी सुद्धा रस्त्या संदर्भात अनेक वेळा मालेगाव तहसील तथा जिल्हास्तरीय कार्यालय मध्ये शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यास मात्र प्रशासनाच्या अनागोंदी कारभार व हलकर्जीपणामुळ कसारपांदन,जांभरूनरस्ता, या सर्व रस्त्याचे काम लोकवर्गणीतून शेतकऱ्यांनी यापूर्वी केले असताना आज परत पांगरी नवघरे ते झोडगा पांदन रस्त्याचे जवळपास 80 हजार रुपयाची लोक वर्गणी संबंधित शेत रस्त्यावर शेतकऱ्यांनी ज्या ज्या व्यक्तींना जाण्यासाठी अडचण होत आहे अशा जवळपास १५ ते २०कष्टकरांनी एैंशि हजार रुपयांची लोक वर्गणी करून सदर झोडगाते पांगरी नवघरे पांदनरस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
सदर झोडगा ते पांगरी नवघरे पांदन रस्त्या करिता पुढील शेतकऱ्यांनी पर व्यक्ती दोन ते तिनहजार रुपये प्रमाणेया मध्ये
स्वप्नील नवघरे, दत्ता नवघरे, ज्ञानबा नवघरे, विकास नवघरे गोपाल नवघरे, मच्छींद्र नवघरे, संतोष जाधव, भागवत नवघरे,किसन जाधव, मारोती नवघरे, गणेश नवघरे, राजु नवघरे, अमोल नवघरे, सुभाष नवघरे, माधव नवघरे, संजय नवघरे,तुळशीराम खडसे, मोतीराम, ज्ञानबा सटकारे, भागवतनवघरे,रामदासनवघरे,गजानननवघरे,आधी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने वर्गणी वर्गणी द्वारे शेत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे सदर शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला एकच विनवणी करण्यात आली आहे की आम्ही लोकवर्गणीतून रस्ता करत आहे त्यामुळे सदर कुठल्याही यंत्रणेने स्थानिक यंत्रणा असो किंवा इतर कुठल्याही बाबतीचा हस्तक्षेप करून आर्थिक मलिदा काढण्याचा प्रयत्न करू कारण शेत पांदन रस्त्याचे काम करत असताना कष्टाच्या पैशाने लोक
वर्गणी करून आम्ही काम करत आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आधारे नसून कुठलाही घर गैरप्रकार संबंधित रस्त्यावर होणार नाही याची काळजी घ्यावी असे सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सांगण्यात आले.
