विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन
रिसोड : भर जहागीर परीसरामध्ये दुपारी एक ते दोन च्या दरम्यान सुसाट्याच्या वा-यासह विजांच्या कडकडाटाला प्रारंभ झाला,विज पडुन संदीप दत्ता काळदाते वय 35 या युवकावर विज पडतल्याने पावसामध्ये या युवकाला रूग्णालयात हालविले,परंतु डाक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.तर मांगवाडी नजीक रस्त्यावर हावे झाडे पडुन काही वेळ वाहतुक प्रभावित झाली.
भर जहागीर परिसरामध्ये दुपारी एक ते दोन दरम्यान भयंकर वा-यासह पावसाला प्रारंभ झाला.यावेळी तुरळक गारी पडल्या नंतर अचानक ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटाला प्रारंभ झाला.यावेळी धुंवाधार पाऊस पडल्याने अनेकांची तारांबळ उडाली,तर भर जहागीर येथिल मोहधरी शेतशिवारात आपल्या शेतामध्ये काम करीत आसतांनी अंगावर विज पडुन संदीप दत्ता काळदाते वय 35 वर्षे या युवकावर विज पडली होती.विजेच्या प्रहाराने सदर युवकाचे तोंड माती मध्ये घुसल्याची माहीती नातेवाईकांनी दिली.याला तात्काळ पुढील उपचारासाठी रिसोड ग्रामीण रूग्णालयात हालविण्यात आले.तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या दरम्यान भर जहागीर परीसरामध्ये भयंकर वारा सुटल्याने मांगवाडी नजिक झाडे उन्मळुन पडल्याने काही वेळा साठी वाहतुक प्रभावीत झालेली होती.एक उमद्या युवकावर विज पडल्याने विजे संदर्भात भिती निर्माण होत आहे.कारण याधी सुध्दा मोरगव्हाण वाडी येथे विज पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला होता.
