उडालेली ठिन पत्रे लागून बैल जखमी भोकरखेड येथील घटना



 प्रतिनिधी अन्सार शेख

रिसोड : गोठ्यावरील टिन पत्रे उडून लागल्यामुळे बैल जखमी झाल्याची घटना भोकरखेड येथे आज दिनांक दुपारी दोन वाजताचे दरम्यान घडली यामुळे मात्र शेतकऱ्याचे एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे .

       चार जून रोजी दुपारी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात टिन पत्रे उडाली तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली भोकरखेड येथे वादळ वाऱ्यामुळे गोठ्यावरील व घरावरील तीन पत्रे उडाली गोठ्यावरील टिन पत्रे उडून बैल जोडीला लागल्यामुळे ज्ञानेश्वर गोविंदा रंजवे यांचे दोन बैल  जखमी झाले यापैकी एक बैल गंभीर जखमी झाला आहे दोन बैल जखमी झाल्यामुळे रंजवे यांचे एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे ऐन पेरणीच्या वेळी बैल जखमी झाल्यामुळे या शेतकऱ्यावर मोठे संकट आर्थिक कोसळले आहे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ज्ञानेश्वर रंजवे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post