मुसळवाडी येथे वीज पडल्यामुळे एकाचा मृत्यू एक गंभीर

 प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड

मालेगाव ता 4 -मुसळवाडी शेत शिवारात आंबे उतरविण्यासाठी गेलेल्या बापलेकाच्या अंगावर विज पडल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना आज ता 3 रोजी घडली 

मुसळवाडी येथिल गोविंदा राजाराम कदम वय 60वर्षे व त्यांचा मुलगा नारायण गोविंदा कदम शेतामध्ये आंबे उतरविण्यासाठी गेले होते दुपारी 3.00 वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्या वेळी विजेच्या गडागडाटासह पाऊस सुरु होता त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडून ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरने नारायण गोविंदा कदम याला मृत घोषित केले तर गोविंदा राजाराम कदम यांच्यावर अमनवाडी येथील डॉक्टर लवकर यांच्यावर प्राथमिक उपचार चालू होते

Post a Comment

Previous Post Next Post