काजळेश्वर ;उकरडा ;पानगव्हान पलाना ;पारवा शेत शिवारातील चित्र .
कारंजा प्रती नीधी / अशोकराव
उपाध्ये : पेरणीचे दिवस जसजसे जवळ येत आहे तस तसा
पेरणीपुर्व शेतीमशागतीने वेग धरला आहे . अनेक शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करीत आहे मात्र काही शेतकरी बैलजोडीने वखरवाईने वेग धरला असल्याचे चित्र काजळेश्वर परीसरात दिसत आहे .
वृत्त असे की मान्सूनचे आगमन लवकरच होणार असल्याने शेतकरी आपली शेती पेरणीला योग्य असावी म्हणून ट्रॅक्टर तसेच काही शेतकरी वखर वाई करतांना काजळेश्वर ;पलाना ;उकर्डा ;पानगवान ;पारवा शेत शिवारात दिसत आहे .वखर वाई बैल जोडीने करतांना मानसाची ;शेतमजूराची वानवा आहे . अशा परीस्थीतीत वखरावर मोठा दगड बांधून काम केले जात असल्याची माहीती काजळेश्वर येथील
युवा शेतकरी सतीश रामा वरघट तसेच हभप मोहन महाराज खोडे यांनी दिली आहे .पेरणीपुर्व कामाला शेतकऱ्यांनी वेग घेतला असतांना वखर वाई ;काडी कचरा वेचणीचे कामे काजळेश्वर परिसरात दिसत आहे .
