कृषी विभागाची कृषी केंद्रावर करडी नजर तक्रारीचा होणार तात्काळ निपटारा.


रिसोड ता.13

शेतकऱ्यांची कुठेही मुळीच फसगत होणार नाही या करिता कृषी विभाग पूर्णपणे दक्ष झाला असून कृषी केंद्रावर कृषी अधिकाऱ्याची करडी नजर आहे 

तसेच शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या सूचना कृषी संचालकांना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

               खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असल्याचे हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे त्यामुळे खते व बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी  लगबग वाढली आहे   खते व बी बियाणे खरेदी करता वेळेस शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाकडून पुरेपूर दक्षता घेण्यात येत आहे याकरिता दररोज कृषी केंद्रांना अचानक भेटी दिल्या जात आहेत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले  आहे जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे खरीप हंगामा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे तसेच आधीच शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याची कुठेही फसगत होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतल्या जात आहे तसेच कृषी केंद्र संचालकांनी खते व बी बियाणे याबद्दल शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप तसेच एन एन जोशी कृषी अधिकारी पंचायत समिती रिसोड यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी तात्काळ कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post