पक्के बील घेऊनच खते खरेदी करा . कृषी विभागाचे आवाहन .
कारंजा प्रतीनिधी / अशोकराव उपाध्ये
रासायनिक खताच्या किमती कमी झाल्याच्या बातम्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्याच्या मनात रासायनिक खताच्या किमती बाबत संभ्रम निर्माण झाला आहे हा संभ्रम दूर करावा अशी मागणी काजळेश्वरचे सरपंच नितीन पा;उपाध्ये यांनी करताच कृषी विभागाने पक्के बिल घेऊनच रासायनिक खते खरेदी करा असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे . मागील चार ते पाच दिवसापासून माध्यमांवरती रासायनिक खताच्या किंमती कमी झाल्याच्या बातम्या धडकत असल्याने शेतकरी कृषी केंद्रावर गेल्या वर खताच्या किमती कमी झाल्याचे दिसून येत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहे . याबाबत सरपंच नितीन पा;उपाध्ये यांनी कृषी विभागाशी संपर्क साधला असता कृषी विभागाने शेतकऱ्यांनी पक्के बिल घेऊनच रासायनिक खते खरेदी करा आणि रासायनिक खताच्या किमती अखेर जाहीर झाल्याचे सांगीतलेआहे. शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी केंद्रातून रासायनीक खते ;बीबीयाणे ;किटकनाशके ;तण
नाशके खरेदी करतांना पक्की बीले
घ्यावीत असे आवाहन कारंजा तालुका कृषी अधीकारी संतोष चौधरी यांनी केले आहे .जाहीर करण्यात आलेल्या रासायनीक खताच्या किंमती डिएपी१३५०रु . प्रगी बॅग .एमओपी १७००रू ;एमपी १५००ते १७०० ;एनपीएस१५००रु .
एनपीएस२०-२०-० प्रती बॅग १२००ते १३००रु .एनपीके१८-१८-१८ प्रतिबॅग१५५०रु .एनपीके१०-२६- २६ प्रतिबैग१४७०रू .
एनपीके१२-३२-१६ प्रती बैग१४७०रु .एनपीके१४-३५-१४ प्रती बैग१५००रु .२०-२०-_० प्रती बॅग ११७५रू .१५_१ ५-१५ प्रती बॅग १४७०यासोबतच इतरही खताच्या किंमती जाहीर झाल्या आहेत . तरी वरील दराप्रमाणे शेतकऱ्यांनी रासायनिक खते खरेदी करावीत कोणताही संभ्रम ठेवू नये .अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा असे आवाहन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी यांनी शेतकऱ्यांना केले आहे .
