*निवृत्तीनाथांची दिंडी उद्या नगरमध्ये; तीन दिवस भुसार, भाजीपाला बाजार बंद




अहमदनगर अफसर शेख



 श्री क्षेत्र त्र्यिंबकेश्वर ते पंढरपूर पायी जाणारा संत निवृत्तीनाथ महाराज पालखी साेहळा १४ ते १५ जून या दाेन दिवसांसाठी नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर मुक्कामी थांबणार आहे. १६ जून राेजी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे नगर कृषी उत्त्पन्न बाजार समितीचा भुसार, फळे व भाजीपाला बाजार तीन दिवस बंद राहणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या वारीसाठी दरवर्षीप्रमाणे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी साेहळा नगर बाजार समिती येथे दाेन दिवस मुक्कामी राहत असताे. निवृत्तीनाथ महाराज दिंडीमध्ये यंदा जवळपास ३५ हजार वारकरी सहभागी झाले आहे.

 *शेतकऱ्यांना विनंती*

शेतकऱ्यांनी तीन दिवस बाजार बंद असल्याने शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणू नये. दिंडी कालावधीमध्ये नेप्ती येथील उपबाजार समितीमध्ये कांदा लिलाव नियमित सुरू राहणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बाेठे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post