अहमदनगर अफसर शेख
दिव्यांगांच्या विविध अडचणी साेडवण्यासाठी 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी' हे अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी अभियानाचे काटेकोरपणे नियोजन करावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील दिव्यांगांचे गावनिहाय सर्व्हेक्षण दिलेल्या वेळेत पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक झाली. महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त प्रशांत खांडकेकर आदी उपस्थित हाेते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले
''दिव्यांगांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावीत, यासाठी जिल्हास्तरीय शिबिराच्या आयोजन करावे.''
