कारंजा - महादेव तायडे दिनांक
८जून २०२३ रोजी कारंजा तालुक्यातील जयपूर येथे सकाळी ठीक ८ वाजता तालुकास्तरीय बीबीएफ यंत्रधारक मालक व त्यांचे चालक यांचे प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी कारंजा , विजयपथ सोयाबीन उत्पादक शेतकरी गट जयपुर व पाणी फाउंडेशन टीम कारंजा यांची संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी मार्गदर्शन करण्याकरता वाशिम जिल्ह्यातील बीबीएफ तंत्रज्ञानाचे प्रवर्तक व तज्ञ मार्गदर्शक राज्य शासनाच्या शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित दिलीपभाऊ फुके मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अनिसा महाबळे मॅडम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम,संतोष वाळके नोडल अधिकारी स्मार्ट वाशिम , संजय चातरमल उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम , कुणाल झालटे तहसीलदार कारंजा ,संतोष चौधरी तालुका कृषी अधिकारी कारंजा , रवींद्र जटाळे, अतुल क्षीरसागर मंडळ कृषी अधिकारी कारंजा, उज्वल बोलवार विभागीय समन्वयक पानी फाउंडेशन ,तसेच कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकने , कृषी सहाय्यक नरेंद्र फुके,विजय पाटील काळे अध्यक्ष विजयपथ शेतकरी गट ,रविंद्र लोखंडे तालुका समन्वयक पानी फाउंडेशन , उपस्थित राहतील. बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्कृष्ट उत्पादन घेतलेले शेतकरी आपले अनुभव कथन करणार आहे.तसेच यावेळी प्रात्यक्षिकही करून दाखविल्या जाणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी या प्रशिक्षणास उपस्थित राहून सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय ,विजयपथ सोयाबीन उत्पादक शेतकरी गट जयपुर तथा पानी फाउंडेशन टीम चे वतीने करण्यात येत आहे.