प्रतिनिधी अन्सार शेख
रिसोड : रिसोड शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे नवीन पिढीवर याचा प्रतिकुल परिणाम होत असून अवैध प्रवासी वाहतुकीचा त्रास सुध्दा मोठया प्रमाणात नागरिकांना त्रास होत आहे. याला आवर घालावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने रिसोड ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
याबाबत अधिक असे की रिसोड तालुक्यात व शहरात वरली मटका, दारू, गुटखा इत्यादी अवैध धंद्यांना जागोजागी ऊत आला आहे.
या व्यवसायाकडे पोलीस व संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे यामुळे नवीन पिढी व्यसनाच्या आधीन जात असून भांडणे व घरातील कटकटी वाढत आहेत.
सोबतच तरुण पिढी कर्जबाजारी व व्यसनाधीन होत आहे.
तर अवैध प्रवासी वाहतूक काळी पिवळी व ईतर वाहने यांचा सुद्धा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ही वाहने रस्त्यातच उभी केली जातात व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी राजरोसपणे फिरवली जातात यावर सुद्धा पोलिसांचे लक्ष नाही .
काही दिवसांनी शाळा सुरू होतील त्यामुळे बरेच विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी ये जा करतात विद्यार्थ्यांवर या गोष्टींचा दीर्घकालीन वाईट परिणाम होऊ शकतो. या व्यवसायाला प्रतिबंध करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने रिसोड ठाणेदाराला एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रिसोड शहरात अनेक ठिकाणी राजरोसपणे हे व्यवसाय चालत असून बस स्टँड परिसरात अतिक्रमित जागेत राजरोसपणे हे व्यवसाय सुरू आहेत याकडे पोलिसांचे अजिबात लक्ष नाही या व्यवसायाला आळा घालावा असे मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले असून याची दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती तालुका अध्यक्ष गोपाल खडसे यांनी दिली.
निवेदनाच्या प्रती जिल्हापोलिस अधीक्षक वाशिम, पोलीस आयुक्त अमरावती गृहमंत्री महाराष्ट्र राज्य इत्यादींना देण्यात आले आहे तर या निवेदनावर
गजानन खंदारे जिल्हा प्रवक्ता वाशिम,तालुकाध्यक्ष गोपाल खडसे .तालुका संघटक विजय झुंजारे. शहराध्यक्ष इब्राहिम खान. संदीप शिंदे .गणेश गव्हाणे. शंकर वानखेडे .समीर पठाण, शेख नासेर शेख हमीद
आदींच्या सह्या आहेत.
