अहमदनगर अफसर शेख
नगरमध्ये मंगळवारी (ता. 7) सकाळी संगमनेर येथे काहीतरी झाले, अशी बातमी पाहिली. त्यानंतर कोल्हापूरला कुणीतरी मोबाइलवर मेसेज पाठवला, तो चुकीचा असेलही मात्र म्हणून लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सध्याचा सत्ताधारी पक्ष अशा गोष्टींना प्रोत्साहित करतो, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केला.
पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे
छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यकर्त्यांनी जबाबदारीने शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारी रस्त्यावर येऊ लागले आणि त्यामुळे दोन गटांमध्ये कटुता निर्माण होत असेल तर ही काही चांगली गोष्ट नाही. राज्यकर्त्यांचे लक्ष पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य शैक्षणिक सुविधा यांच्यावर अधिक असायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
अशा घटना घडविल्या जात आहेत. सकाळी टीव्हीवर पाहिले कोणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात दंगल करण्याचे काय कारण आहे? पुण्यात आंदोलन करण्याचे काय कारण आहे? औरंगजेबाचा फोटो दाखवला म्हणून काय परिणाम होतो, मला कळत नाही, असे मत त्यांनी मांडले.
