शिरूर मध्ये धक्कादायक प्रकार नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार





प्रतिनिधी शंकर तिडके 


शिरूर शहरामध्ये  एका मुलीला तिचे नग्न फोटो काढून ते फोटो मोबाईलवर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी ओमकार राजाराम चव्हाण (रा. निर्माण प्लाझा, शिरूर) या युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2022 ते 9 जुन 2023 या कालावधीत ओमकार चव्हाण याने त्याचे राहत्या घरी एका अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावुन तिचे नग्न फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढून घेतले. तसेच सदरचे फोटो मी व्हायरल करीन, अशी धमकी देवुन वारंवार तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध त्याच्या मित्राच्या घरी (नाव माहीत नाही) गुजरमळा, शिरूर येथे तसेच ओमकार याच्या निर्माण प्लाझा, शिरूर येथील राहत्या घरी वेळोवेळी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.

त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने त्यास पुन्हा भेटायला नकार दिला असता. ओमकार याने तिला तिच्या घरामध्ये येवुन मला भेटायला ये, माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुला उचलून नेईन, तुझे अख्खे खानदान संपवेन, मी फाशी घेईन, अशी धमकी दिली आहे, म्हणुन सदर युवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनच्या महीला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले ह्या करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post