दै.लोकन्याय संघर्ष प्रतिनिधी हवेली-तौफिक शेख
आज लोणी काळभोर येथील आलमगीर जामा मस्जिद ट्रस्ट व समस्त मुस्लिम बांधवांची एकत्रित विठ्ठल मंदिर या ठिकाणी बकरी ईद सणाच्या संदर्भात मीटिंग आयोजित करण्यात आली होती .सर्व मुस्लिम बांधवांना ग्रामस्थांच्यावतीने विनंती करण्यात आली की हिंदू धर्मातील पवित्र सण आषाढी एकादशी व मुस्लिम धर्मातील बकरी ईद दोन्ही एकाच दिवशी आल्याने आषाढी एकादशी या दिवशी आपण बकरी ईद निमित्त कुरबानी देऊ नये त्यावर सविस्तर चर्चा होऊन मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कुरबानी न करण्याचा निर्णय मान्य केला. या निर्णयाला सर्व मुस्लिम बांधवांनी समर्थन दिले. व आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी देणार नाही अशा प्रकारचे निवेदन यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने लोणी काळभोर व कदमवाक वस्ती चे सरपंच यांना देण्यात आले सर्व समस्त मुस्लिम बांधवांना लोणी काळभोर ग्रामस्थ ग्रामपंचायत तसेच कदमवाक वस्ती ग्रामस्थ व श्री. काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मान्यत आले. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण साहेब यांनी लोणी काळभोर मुस्लिम समाचे कौतुक केले. यावेळी लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण साहेब पोलीस निरीक्षक गुन्हे चे सुभाष काळे P.S.I. सदाशिव गायकवाड P.S.I. गोरे साहेब पोलीस हवालदार रामदास मेमाणे साहेब लोणी काळभोर चे सरपंच योगेश काळभोर कदमवाक वस्ती चे सरपंच चित्तरंजन गायकवाड पोलीस पाटील लक्ष्मण दादा काळभोर ग्राहक संरक्षण समितीचे मा.मंत्री सूर्यकांत गवळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अल्पसंख्यांक विभागचे सरचिटणीस गफूरभाई शेख ग्रा.प. सदस्य राहुल काळभोर अलगिर जामा मस्जित चे अध्यक्ष फायज इनामदार, रहमान इनामदार,दिलावर इनामदार, रशीद इनामदार, अफजल इनामदार, हनिफ शेख,रियाज शेख,समीर खान,रमजान तांबोळी, तौसिफ शेख,राज काळभोर आप्पा काळभोर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
