गुजरात राज्यातून एमआयडीसी परीसरात चोरी करण्याचे इरादयाने आलेल्या सराईत गुन्हेगारास अटक-एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी



प्रतिनिधी अफसर शेख



दिनांक 19/06/2023 रात्री 20/00 ते 05/00 दरम्यान रात्रगस्त दरम्यान पेट्रोलिंग करीत असतांना शेंडी बायपास रोड शेंडी शिवार येथे एक इसम स्वतःचे अस्तित्व लपवुन एका टपरीचे आडोशाला लपवुन बसलेला दिसला त्यावेळी रात्रगस्त करीता नेमलेल्या पोलीस अमलदाराला त्याचा संशय आल्याने ते त्यास पकडण्याकरीता त्याचे दिशेने जावु लागले असता सदर आरोपी हा पोलीसांना पाहून पळुन जावु लागला त्यावेळी रात्रगस्त करीता नेमलेल्या पोलीस अमलदारांनी त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले. व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव आकाशकुमार किरीटभाई पटेल वय ३० वर्ष रा.कोठयु फल्यु बराड ता. बारदोली जि सुरत गुजरात असे सांगीतले. व तो मालाविरुदध गुन्हा करण्याचे इरादयाने स्वतःचे अस्तित्व लपवतांना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु रजि नंबर ५३३ / २०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे आकाशकुमार किरीटभाई पटेल हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर महाराष्ट्र


गुजरात येथे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.


१) वाडोदरा पोस्टे गुजरात गु रजि नंबर - ११०/२०१४ भादवि कलम ३७९ प्रमाणे.


२) दादर रेल्वे पोलीस स्टेशन मुंबई गु रजि नंबर २३१/२०१७ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे. ३) दादर रेल्वे पोलीस स्टेशन मुंबई गु रजि नंबर १११७ /२०१७ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे.


४) दादर रेल्वे पोलीस स्टेशन मुंबई गु रजि नंबर ३५८/२०१७ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे. ५) नंदुरबार पोस्टे गु रजि नंबर २६३/२०१८ भादवि कलम ३७९, ४११ प्रमाणे. ६) दादर रेल्वे पोलीस स्टेशन मुंबई गु रजि नंबर १२६५ / २०१७ भादवि कलम ३७९, ४११ प्रमाणे.


७) दादर रेल्वे पोलीस स्टेशन मुंबई गु रजि नंबर ३००२ / २०१७ मु.पो. का. कलम १२४ प्रमाणे. गु ८) सुरत रेल्वे पोलीस स्टेशन गु रजि नंबर ४४ / २०१४ भादवि कलम ३७९ प्रमाणे. ९) बारदोली पोलीस स्टेशन सुरत गु रजि नं. १२९/२०१४ भादवि कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे. 10) एमआयडीसी पोलीस स्टेशन अहमदनगर गु. रजि. नंबर ५३३/ २०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे.


सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर, श्री. संपत भोसले सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोहेकॉ / महमंद शेख, पोहेकॉ गिरवले, पोकॉ/ किशोर जाधव, पोकों/ नवनाथ दहिफळे, पोकॉ/ शुभम सुद्रिक यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post